नाशकात सीबीआयचे कार्यालय होणार

नाशकात सीबीआयचे कार्यालय होणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारत सरकारच्या विविध कार्यालयातील कर्मचारी कुणाही नागरिकांकडे लाचेची ( Bribe )मागणी करत असल्यास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय ) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क करण्याची माहिती होण्याकरिता ४ व ५ मे रोजी नाशिक मध्ये दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक रणजित कुमार पांडे (Bribery Prevention Division Police Inspector Ranjit Kumar Pandey ) यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक (Bribery Prevention Department Nashik ) व केंद्रीय अन्वेषण ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई (Central Bureau of Investigation Bribery Prevention Division Mumbai ) यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार,केंद्रीय अन्वेषण ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक गजानन देशमुख,जे. प्रेमकुमार,नरेंद्र कुमार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पांडे यांनी सांगितले कि,भारत सरकारशी संलग्न जीएसटी,आयकर,रेल्वे,बॅंक,किंवा केंद्रीय संस्थेतील अधीकारी अथवा कर्मचारी यांच्यापैकी कुणीही लाच मागितल्यास सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे व्हाट्स अप व दुरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला असून कुणीही त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यांच्याकडे जाऊन त्यांची तक्रार घेईल व नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल असेही पांडे यांनी सांगितले. येत्या ४ व ५ मे रोजी सातपूर येथील इ २४ स्टेट बॅंक ऑफ इंडिया येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कुणाच्या काही तक्रार असल्यास सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पांडे यांनी केले.

आगामी काळात नाशकात सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय

सध्या स्वतःची जागा नसल्यामुळे स्टेट बॅंकेची जागा वापरणार असून भविष्यात जागा उपलब्ध झाल्यास सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय तयार होईल यामुळे नागरिकांना सोयीचे ठरेल तसेच भ्रष्टाचारी व लाचखोरांना जरब बसण्यास मदत होईल.

रणजित कुमार पांडे ,पोलीस निरीक्षक, केंद्रीय अन्वेषण ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

येथे साधा संपर्क

केंद्रीय अन्वेषण ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

व्हाट्स अप क्रमांक : ८४३३७०००००

दुरध्वनी क्रमांक : ०२२-२६५४३७००

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक

टोल फ्री क्रमांक : १०६४

व्हाट्स अप क्रमांक : ९९३०९९७७००

दुरध्वनी क्रमांक : ०२५३-२५७५६२८ , २५७८२३०

Related Stories

No stories found.