उद्योजक संघटनेची बदनामी रोखण्यासाठी सर्वमान्य मध्यस्थी व्हावी  
उद्योजक संघटनेची बदनामी रोखण्यासाठी सर्वमान्य मध्यस्थी व्हावी  
नाशिक

उद्योजक संघटनेची बदनामी रोखण्यासाठी सर्वमान्य मध्यस्थी व्हावी  

मसिआ व आयमा अध्यक्षांची मागणी

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | Satpur (प्रतिनिधी)

निमाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात उद्योजक संघटना बदनाम होत असून, हे थांबवण्यासाठी सर्वमान्य मध्यस्थीचे प्रयत्न व्हावे असा प्रस्ताव महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांसह निमाच्या काळजीवाहू सरचिटणीस यांनी वार्तालाप चर्चेत केला. हॉटेल एसएसके येथे आयोजित वार्तालाप चर्चेत हा सूर उमटला होता.

यावेळी व्यासपीठावर निमाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, आयमा अध्यक्ष वरुण तलवार, निमा निवडणूक समितीचे अध्यक्ष डीजी जोशी, नवनिर्वाचित सरचिटणीस आशिष नहार, खजिनदार संदीप भदाणे तसेच मधुकर ब्राह्मणकर, मंगेश पाटणकर, ललित बूब, ज्ञानेश्वर गोपाळे, मसिआचे अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी निमाच्या विविध घटनाक्रमावर मान्यवरांनी कायदेशीर बाबींच्या दृष्टीतून प्रकाश टाकला घटनेच्या प्रत्येक कलमाच्या आधारावरच कार्यवाही करण्यात आली असल्याचे मनीष कोठारी यांनी नमूद केले.

वरुण तलवार यांनी आयमाच्या घटनेतील तरतुदींचा पाढा वाचत मिळालेल्या मुदत वाढीबाबत कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या.

यावेळी काळजीवाहू सरचिटणीस नहार यांनी नवीन पदभार स्विकारताना स्वागत कंटेनमेंट झोनच्या लॉकडाऊनने व 15 बाउंसर च्या माध्यमातून झाल्याने दुःख वाटल्याचे सांगितले.

उद्योगांच्या विकासासाठी असलेल्या संघटनेच्या वादविवादात मुळे जनसामान्यांमध्ये ही नाव खराब होत आहे. हे असेच चालत राहिले तर निमा मध्ये चांगले उद्योजक कधीच अर्ज दाखल करणार नाहीत.

त्यामुळे निमाला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी निवडणुकीचा निकाल पर्यंत आम्ही काम करणार आहोत. या वादविवादाला पूर्णविराम देण्यासाठी समन्वय साधण्याची गरज असल्याचे नमूद केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com