नाशिक शहरात उद्या पाणीबाणी

नाशिक शहरात उद्या पाणीबाणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सातपुर विभागातील Satpur Area , त्र्यंबकरोड, आय.टी.आय. समोर मेघा इंडस्ट्रीज कंपाऊंड लगत 600 मी.मी. व्यासाची शुध्द पाण्याची ग्रॅव्हेटी मेन पाईपलाईनची दुरुस्ती Repair works of pipeline करावयाची आहे. संपुर्ण पाईप बदलायचा आहे.

तसेच गंगापुर डॅम पंपीग स्टेशन रस्त्यावरील उर्ध्ववाहीनी (रायझिंग मेन) पाईपलाईनला गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे.

मुकणे डॅमची 220 के.व्ही फिडर लाईनकरीता (विद्युत वाहीनी) दि. 27/11/2021 रोजी महावितरण यांच्याकडून शट डाऊन आहे.

नाशिक शहरातील मुख्य पाईपलाईनचे दुरुस्तीचे व देखभाल दुरुस्तीचे व कामे हाती घ्यावयाची असल्याने शनिवार दि. 27/11/2021 रोजी संपुर्ण दिवस नाशिक शहराचा पाणी पुरवठा Water Supply बंद राहील व रविवार दि. 28/11/2021 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती महापालिक्देक्डून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com