नाशिककरांनो! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; 'हे' आहे कारण

नाशिककरांनो! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; 'हे' आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) येत्या शनिवार बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नाशिककरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे...

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुकणे (Mukne) आणि गंगापूर धरणावरील (Gangapur Dam) पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी महावितरण (Mahavitaran) वीज पुरवठा बंद ठेवणार असल्याने पाणी पुरवठा होणेही शक्य नाही. त्यामुळे शनिवारी पाणीपूरवठा बंद (water supply) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिककरांनो! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; 'हे' आहे कारण
मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने संपूर्ण दिवस पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिककरांनो! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; 'हे' आहे कारण
राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com