मिळकत धारणाबदलास अडचण नाही : भुसे

मिळकत धारणाबदलास अडचण नाही : भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

ब-सत्ता प्रकार म्हणून नोंदविलेल्या तसेच निवासी, कृषिक, वाणिज्य, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 (Land Occupant Class-1) या धारणाधिकारामध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत.

ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह डिसेंबर पुर्वी अर्ज दाखल करावे असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना केले.

येथील शासकीय विश्रामगृहात ब-सत्ता प्रकाराच्या कामकाजाचा आढावा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे, नगर भूमापन (Town survey) अधिकारी किरण चौधरी, उप अधिक्षक भूमी अभिलेख (Land records) राहुल पाटील, दुय्यम निबंधक भोये, वाघ, लहाने यांच्यासह बंडू माहेश्वरी, राजेंद्र साळुंखे, शाम अग्रवाल, रणभोर, सखाराम घोडके, किशोर बच्छाव, अ‍ॅड. सतीश कजवाडकर यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

ब-सत्ता प्रकरणांचा धारणाधिकार रुपांतरीत करण्यासह यातून झालेल्या शासकीय वसुलीच्या कामाचा आढावा घेत भुसे यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित सर्व ब-सत्ता प्रकार मिळकत धारकांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना माहीत होण्यासाठी वैयक्तिक नोटीसीने कळविण्यासह याबाबत जनजागृती होण्यासाठी शिबिरांचे आयोजन (Organizing camps) करुन उर्वरित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

संबंधित अर्जदार यांचेकडून कमीत कमी कागदपत्रे प्राप्त करुन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उप अधिक्षक भुमी अभिलेख, नगर भुमापन, दुय्यम निबंधक (Secondary registrar) व अपर जिल्हाधिकारी या कार्यालयांनी समन्वय ठेवून कामकाज करावे. तसेच झालेल्या प्रगतीकामाचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे बैठकांचे आयोजन करण्याबाबतही भुसे यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com