खुशखबर : यंदा नाशिकवर पाणीकपातीचे संकट नाही
पाणी

खुशखबर : यंदा नाशिकवर पाणीकपातीचे संकट नाही

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणात सध्या ४० टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे गौतमी धरण व कश्यपी धरणातून ही पाणी मिळत असल्यामुळे यंदा यावर्षी नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट राहणार नसल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली...

यंदा पाणीकपात टळली असली तरीदेखील पाण्याचा वापर जपूनच करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

दरवर्षी नाशिककरांवर काही प्रमाणात का असेना मात्र पाणीकपातीचे संकट ओढवले जात असते. यंदा मात्र पाणीकपात होणार नसल्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत.

मे महिना आता संपत आला आहे तर जूनमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. पाऊस चांगला पडला तर पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल, मात्र तोपर्यंत आपल्याकडे पुरेल एवढा मुबलक जिवंत पाणीसाठा असल्याने यंदा पाणीकपात केली जाणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com