महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे
नाशिक

सद्या नाशिक शहरात लॉकडाऊनची गरज नाही - आयुक्त गमे

फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

आयसीएमआरच्या माहितीनुसार जुलै अखेर शहरात 8 हजारापर्यत रुग्णांची संख्या वाढणार आहे. असे असले तरी सध्या 85 टक्के रुग्ण उपचाराविना बरे होत असुन लक्षणे नसलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांवर घरी उपचार सुरू केले आहे.

शहरातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भात आढावा घेतला जात अजुन चर्चा होत असली तरी अर्थिक चक्र चालु राहिले पाहिजेत. त्यामुळे सध्या तरी नाशिक शहरात लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्टीकरण आज महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

नाशिक महापालिका आयुक्त गमे यांनी आज फेसबुकच्या माद्यमातून नाशिककरांशी संवाद साधला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि शहरात वाढत असलेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची चिंता वाढलेली असुन अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिककरांना आयुक्तांनी शहरातील एकुणच करोना स्थितीची माहिती दिली.

19 मे पर्यत शहरात केवळ 50 करोना रुग्ण होते, मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर नाशिक शहरात बाहेरुन येणार्‍यांची संख्या वाढली, त्यांच्या मायमातून आणि नाशिक मार्केट मधुन भाजीपाला मुंबईला गेल्यानंतर आलेल्या संपर्कातून शहरात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरात सद्या 24 मेजर हॉटस्पॉट असलेले प्रतिबंधीत क्षेत्र असुन 250 इमारतींना प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

यातील 24 ठिकाणावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले असुन याठिकाणी 400 डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. डायबेटीस, दमा, रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या चाचणीवर भर देण्यात आला आहे. आयसीएमआर च्या निर्देशानुसार दहा लाख लोकसंख्येमागे 157 चाचणी करण्यात येत असली तरी आपल्या नाशिक शहरात सध्या दररोज 500 चाचण्या केल्या जात आहे. सध्या शहरात 5444 रुग्ण असुन यापैकी 65 टक्के रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असुन केवळ 35 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहे. यातील 1322 रुग्णांवर उपचार सुरू असुन 500 जण आक्सीजनवर असुन 55 रुग्ण व्हेंटीलेटर आहे.

करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी एक रुग्णांमागे 2 3जणांची तपासणी केली जात असुन हे प्रमाण देशात व राज्यात मोठे आहे. सध्या 20 ते 40 वर्ष वयोगटातील रुग्ण करोनाग्रस्त होत असुन दक्षता न घेणे, मास्क न वापरणे, अति आत्मविश्वास यातून या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात रुग्ण वाढत असले तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटाईजर करणे अशा बाबी नागरिकांनी पाळाव्यात, यातूनच प्रादुर्भाव रोकणे शक्य होईल असेही आयुक्तांनी सांगितले.

आयुक्तांनी सांगितल्या नवीन उपाय योजना...

* रुग्णांलयासंदर्भातील तक्रारीसाठी तीन हेल्प लाईन- 9607432233, 7030300300 व 02532317292.

* रुग्णालयात बिले तपासणीसाठी 22 लेखापरिक्षक कार्यरत

* दररोज 1 हजारापर्यत अ‍ॅन्टीजेन चाचणी करणार.

* उद्यापासुन 20 मोबाईल दवाखाने शहरात कार्यरत होणार.

* नगरसेवक, सामाजिक संस्थानी मदतीसाठी पुढे यावेत.

* शहरात सर्वच रुग्णालयात पुरेशा खाटा.

* ऑन लाईन खाटा उपलब्ध करुन देणार.

* पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच उपचार दिले जाणार.

* महापालिकेकडे औषधसाठा पुरेशा, औषध काळाबाजारावर लक्ष.

* व्हेटीलेटर व्यवस्था पुरेशी.

Deshdoot
www.deshdoot.com