सुरगाणा तालुक्यात शववाहिकाच नाही..!

मृतदेह कारने स्मशानभूमीत
सुरगाणा तालुक्यात शववाहिकाच नाही..!

हतगड । Hatgad

सुरगाणा तालुक्यातील सतखांब येथील स्मशानभूमीत पहिल्यांदाच अंत्ययात्रेविना पार्थिव थेट स्मशानभूमीत कारने पोहचवावे लागले. तिघा पुत्रांना पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ एका सुशिक्षित कुटुंबावर आली आहे.

विशेष म्हणजे सुरगाणा तालुक्यात पार्थिव नेण्याकरीता अद्यापही शववाहिका नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान तिघा पुत्रांनी कारने आपल्या पित्याचा मृतदेह स्मशानभूमीत पोहचवला.

सध्या ग्रामीण भागातही करोनाने कहर केला असून आदिवासी भागातील ही घटना हृदय हेलावून टाकणारी आहे. व्यक्त केली जात आहे.

याबाबत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुले यांनी सांगितले की, संबंधित रुग्णास दहा ते बारा दिवसापासून करोना सदृश्य लक्षणे जाणवत असतांना घरगुती उपचार तसेच कोणतीही करोनाची तपासणी न करताच खाजगी डाॅक्टरांकडे उपचार घेतले.

काल (दि. १३) रोजी पहाटे रुग्णास श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com