नाशिकमधील घरपट्टी माफीवर महासभेत चर्चा नाहीच

नाशिकमधील घरपट्टी माफीवर महासभेत चर्चा नाहीच
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर नाशिकमधील पाचशे चौरस फुटापर्यंत मिळकत धारकांना मिळकत कर (Tax) माफ करण्याची मागणी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांना पत्र देऊन केली होती. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव महासभेत (General Body Meeting) ठेवण्याचे आदेश दिले होते...

काल झालेल्या ऑनलाईन महासभेत हा विषय घेण्यात आला नाही. याबाबत संबंधित उपायुक्तांना करोनाची (Corona) लागण झाल्यामुळे त्या अनुपस्थित होत्या म्हणून हा विषय घेण्यात आला नाही, अशी माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली. मात्र पाचशे फुटापर्यंतच्या मिळकतधारकांना कर माफी मिळावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

मागील दोन वर्षात करोना (Corona), लॉकडाऊनमुळे (Lockdown) सामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. उत्पन्नाचे स्रोत कमी झाले असून अशावेळी महापालिकेने (Nashik NMC) पाचशे चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर (Property Tax) माफ करावा, त्यासाठी आपण पत्र दिले आहे. दरम्यान शहरातील सुमारे दीड लाख वाढीव घरांना घरपट्टी लागलेली नाही तसेच अनेक ठिकाणी नवीन वास्तू घरपट्टीविना आहे.

त्यांना नियमित घरपट्टी लागू केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील महापालिकेच्या बीओटीने भूखंड विकसित होणार आहे, तसेच नव्याने तयार होणाऱ्या आयटी हब (IT Hub) व लॉजिस्टिक पार्क (Logistic Park) यामुळेदेखील महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे सहा कोटींची वार्षिक भर पडणार आहे. अशा वेळी महापालिकेने पाचशे चौरस फुटापर्यंत मालमत्ता माफ केल्यास मोठा तोटा होणार नाही, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.