अजूनही संपादित जमिनीचा शेतकर्‍यांना मोबदला नाही

अजूनही संपादित जमिनीचा शेतकर्‍यांना मोबदला नाही

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

पुनदखोरे, सुळे डावा कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 13 वर्ष उलटून शेतकर्‍यांना (farmers) मोबदला मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बिजोरे, गांगवण, गणोरे, ककाणे, शेरीदिगर, भुतानेदिगर, विसापूर, दरेभणगी, भादवण, पिळकोस, चाचेर या गावांमध्ये धरणाच्या पाटचारीसाठी ज्या शेतकर्‍याच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्या शेतकर्‍यांच्या पाटचारीत गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. 8 दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांची शेतकर्‍यांनी व शिवसेना नेते जितेंद्र पगार, संदिप वाघ, प्रकाश पवार यांनी भेट घेत आपली कैफियत मांडली होती.

या अनुषंगानने पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाठबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रोहित पवार (Rohit Pawar, Assistant Engineer, Pathbandhare Department) यांच्या कळवण को. फाटा येथिल कार्यलयात बाळासाहेबांची शिवसेना (shiv sena) कळवण तालुका (kalwan taluka) पदाधिकारी जितेंद्र पगार, संदीप पगार व प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांसमवेत संयुक्त बैठक पार पडली. लवकरच वाढिव मोबदल्या साठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, पुनदखोरे (punadkhore) येथिल शेतकरी (farmers) यांची एकत्रीत बैठकीचे नियोजन होणार आहे.

बैठकीस जितेंद्र पगार, संदिप वाघ, प्रकाश पवार, प्रमोद पाटील, भीका पाटील, कैलास जाधव, देवाजी जाधव, बाळकृष्ण पाटील, निंबा पाटील, कारभारी गुंजाळ, भिका पाटील, लक्ष्मण पाटील, राजेंद्र वाघ, शिवाजी पाटील, बापू जाधव, हेमंत शेवाळे, दामू शेवाळे, नाना सोनवणे, गोविंद शेवाळे, हिरालाल शेवाळे, अशोक शेवाळे, रामदास शेवाळे आदी उपस्थित होत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com