'या' गावातील नागरिक स्मशानभूमीपासून वंचित

'या' गावातील नागरिक स्मशानभूमीपासून वंचित
USER

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ आजही मूलभूत सुविधांपासून (Basic facilities) वंचित असल्याचे दिसून येते. रोहिले (ता. त्र्यंबकेश्वर) गावामध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमी (Cemetery) नसल्याने उघडया जागेत अंतिमविधी करावा लागतो अशी अवस्था या गावाची आहे.

या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वखाली त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी (Block Development Officer) यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने ही समस्या लवकरात लवकर निकाली काढावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी रोहिले ग्रामपंचायत (Rohile Gram Panchayat) सदस्य संतोष ताठे, अंजनेरी गटप्रमुख हरिष तुपलोंढे, संजय ताठे त्र्यंबक ताठे, भगवान ताठे, संपत ताठे, सुनील ताठे, विनायक ताठे, अजय ताठे, हरिश्चंद्र ताठे. यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com