भाजप-शिवसेनेशी युती नाही- वंचित आघाडी प्रदेशाध्यक्षा ठाकूर

भाजप-शिवसेनेशी युती नाही- वंचित आघाडी प्रदेशाध्यक्षा ठाकूर

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

महापालिका NMC व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत Local Bodies Election प्रमुख पक्षांनी युतीचा प्रस्ताव ठेवला तर भाजप आणि शिवसेना BJP & Shivsena सोडून वंचित बहुजन आघाडी कोणाशीही युती करायला तयार असल्याचे प्रतिपादन वंचित आघाडी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर Rekha Thakur- Vanchit Aaghadi यांनी काल पत्रकार परिषदेत केले. एमआयएमशी पुन्हा युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी आणि पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले हेट स्पीच प्रोहिबिशन अ‍ॅक्टला मंजूरी मिळावी, यासाठी 22 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकूर या महाराष्ट्रात संघटन दौरा, संवाद मेळावे घेत आहेत. नाशिकरोड येथे मेळावा झाल्यानंतर त्या बोलत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख गणेश शिंदे, वामन गायकवाड, चित्रा कुर्‍हे आदी उपस्थित होते. रेखाताई ठाकूर म्हणाल्या की, मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणाचाही चार राजकीय पक्ष चुथडा करणार आहेत.

ओबीसी विरुध्द मागास जाती असे भांडण लावण्याचा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. प्रस्थापित पक्ष ओबीसींचे पाठीराखे नाहीत. त्यांची भूमिका बोटचेपी आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला कायदेशीर आधार नाही. अमरावती, नांदेड, मालेगाव येथे झालेल्या जातीय दंगली या ठरवून तसेच राजकीय फायद्यासाठी केलेल्या आहेत.

जात आणि धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे करून दंगली घडवल्या जातात, विद्वेष पसरवला जातो. त्याला प्रतिबंध करावा, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, यासाठी प्रकाश आंबेडकरांनी हेट स्पीच प्रोहिबिशन विधेयक मांडले आहे. त्याला मंजूरी मिळावी यासाठी आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ठाकूर यांनी उत्तर महाराष्ट्र विभागीय समिती जाहीर केली. अध्यक्षपदी प्रा. चंद्रमणी लभाणे (जळगाव), महासचिवपदी वामनराव गायकवाड (नाशिक), उपाध्यक्षपदी रविकांत वाघ (धुळे) आणि अरुण रामराजे (नंदुरबार), संघटकपदी संजय सुखदान (नेवासा) यांची नियुक्ती करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com