
नाशिक | प्रतिनिधी
घरोघरी आनंद, चैतन्य आणि उत्साहाचा वर्षाव करणार्या मंंगलमुर्ती श्री गणेशाच्या आगमनासाठी सारा जिल्हा सज्ज झाला. आज गणेशाची प्रतीष्ठापना घराघरात होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. यंंदा मंगळवार गणेश चतुर्थीच्या दिवशीच रवी योगात गणेश चतुर्थी साजरी केली जाईल, परंतु त्या दिवशी सकाळपासून भद्रा चे दर्शन होत आहे. त्यामुळे यंदा गणेश आगमन कधी करायचे, त्यासाठी योग्य वेळ कोणती याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
१९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला सकाळी ०६.०८ वाजल्यापासून रवि योग असून तो दुपारी ०१.४३ वाजता संपेल. रवि योगात गणेश चतुर्थीची पूजा करणे शुभ आहे. रवियोग हा शुभ योग मानला जातो.मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून भद्रा सुरू होईल. सकाळी ०६.०८ ते दुपारी ०१.४३ पर्यंत भद्राची सावली राहील.
भद्रा काळात शुभ कार्य करण्यास मनाई असते. भद्राच्या काळात शुभ कामे निषिद्ध मानले जातात, परंतु उपवास आणि पूजा निषिद्ध नाही. गणेश चतुर्थीला पाताळ की भद्रा असते, ज्याचे दुष्परिणाम पृथ्वीवर विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे अडचण नाही.
गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०१ पासून दुपारी १ वाजून २८ मिनिटांपर्यंत आहे. भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी विशिष्ट मुहूमुहूर्त नसतो, परंतु प्रात:काळापासून मध्यान्हापर्यंत दुपारी दीड वाजेपर्यंत गणेशाची स्थापना करता येईल. सार्वर्जनिक गणेशाची स्थापना सकाळी शक्य नसल्यास दुपारी दीड ते संध्याकाळी साडेसहापर्यंत करता येईल, असे पुरोहितांनी सांंगीतले.