दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणाऱ्या अनुदानात झाली 'इतकी' वाढ

दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणाऱ्या अनुदानात झाली 'इतकी' वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत (Department of Social Welfare) दिव्यांगांसाठी (disabled) राबविण्यात जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या जाचक अटी (oppressive conditions) शिथील करण्याच्या प्रस्तावाला महासभेने हिरवा कंदिल दिला आहे.

त्याचबरोबर दिव्यांगांना (disabled) दरमहा दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य योजनेच्या (Financial Assistance Scheme) रकमेतही वाढ करण्याचा निर्णय महासभेने गेतला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी आज महासभा घेत विविध विषयांना मंजुरी दिली. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या दहा कल्याणकारी योजनांची (Welfare Schemes) अंमलबजावणी करण्यात येते.

काही जाचक अटींमुळे (oppressive conditions) अनेक दिव्यांगांना या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी (Disability Welfare Schemes) राखीव असलेला निधीही (fund) खर्च होत नसल्यामुळे या योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्याचा उदात्त हेतूही सफल होणे अवघड बनले होते.

समाजकल्याण विभागाचे (Department of Social Welfare) तत्कालिन उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर (Deputy Commissioner Dr. Dilip Menkar) यांनी सेवानिवृत्तीच्या दोन दिवस अगोदर हा प्रस्ताव महासभेकडे पाठवत मानवतेचे दर्शन घडविले होते.

त्यावर आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शिक्कामोर्तब करत दिव्यांगांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातून प्रौढ बेरोजगार दिव्यांगासाठी अर्थसहाय्य योजना राबविली जाते. या योजनेतील ४० वर्षांवरील दिव्यांसांठीची अट वगळण्यात आली असून दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणाºया अनुदानातही एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com