...तर जि. प. सेवकांच्या बदल्या लांबणीवर

...तर जि. प. सेवकांच्या बदल्या लांबणीवर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या निवडणुका( Elections of Zilla Parishad ) जाहीर झाल्याच तर मे महिन्याच्या अखेरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्या ( Transfers )होणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास सलग तिसर्‍या वर्षी सेवकांच्या बदल्या होणार नाही. त्यामुळे बदलीसाठी इच्छुकांचा हिरमोड होणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनांनुसार सेवकांच्या सेवाज्येष्ठतेच्या याद्या तयार करून ठेवल्या आहेत. मात्र, बदली प्रक्रिया राबवल्यानंतर सर्वसाधारण भागातील आधीच रिक्त असलेल्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडण्याच्या भीतीने प्रशासनामध्येही या बदली प्रक्रियेबाबत अनुत्साह असल्याचे दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जूनअखेरपर्यंत होऊ शकतील, असा अंदाज आहे. तसेच जुलैच्या मध्यापर्यंत प्रशासक कारकीर्दीची मुदत असून, तोपर्यंत सर्व पदाधिकार्‍यांच्या निवडीही होतील, असा अंदाज वर्तवला जात असतानाच, मेअखेरपासून निवडणूक आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज आहे.

यामुळे यावर्षीही सेवक बदल्यांची प्रक्रिया राबवता येणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. करोना महामारीमुळे मागील दोन वर्षे जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवली गेली नाही. केवळ विनंती व विशेष बदल्या करण्यात आल्या. मागील वर्षी केवळ 10 टक्के बदल्या करण्याचे सरकारचे निर्देश होते. यावर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जूनमध्ये झाल्यास बदली प्रक्रियेतून प्रशासनाची सुटका होणार आहे.

Related Stories

No stories found.