...तर शाळांवर कारवाई होणार

मराठी भाषा अध्ययन व अध्यापन सक्तीचे; शिक्षण विभागाचे परिपत्रक
...तर शाळांवर कारवाई होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्यातील Maharashtra State सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे Compulsory teaching and learning of Marathi language करण्याबाबत अधिनियम 2020 अंतर्गत सक्तीचा असलेला मराठी विषय शिकवत नसलेल्या शाळांवर कारवाई Action on schoolsहोणार आहे. यानुसार एक लाख रुपयांपर्यत शाळांवर कारवाई केली जाणार असून याबाबत शाळांकडून खुलासा मागितला जाणार आहे.

मातृभाषेतला विषय सक्तीने शिकवला जावा यासाठी मराठी विषय प्रत्येक शाळांच्या प्रत्येक वर्गात शिकवला जावा व त्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून या संदर्भातील 16 मार्च 2020 च्या निर्णयानुसार परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळांना सूचना दिल्या होत्या . मात्र, अशा सूचना देऊन सुद्धा राज्यातील अनेक शाळा मराठी भाषा विषय शिकवत नसल्याचे किंवा या निर्णयाचा अवलंब करत नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे ज्या शाळा या निर्णयानुसार मराठी भाषा सक्तीने शिकवत नाहीत, अशा शाळांना एक लाख रुपयांपर्यंत कारवाई करण्यात यावी शिवाय शाळांकडून खुलासा मागविण्यात यावा, अशा प्रकारचे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. सोबतच शाळांबाबत शिक्षणाधिकारी स्तरावर निर्णय घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या शाळा मराठी भाषा विषय शिकवत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयामध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून ज्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जात नाही, त्या शाळांमध्ये सुद्धा प्राथमिकसाठी इयत्ता पहिली या वर्गाला तर माध्यमिक शाळांसाठी इयत्ता सहावी या वर्गाला मराठी भाषा विषय सुरू करून चढत्या क्रमाने प्रत्येक वर्षी पुढच्या वर्गाला तो विषय सुरू राहील, अशा प्रकारे नियोजन करून हा विषय शिकवला जावा, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्णय उत्तम आहे. तरी मुलांना शिकवणारे शिक्षक हे मराठी भाषेतून पदवीधर प्रशिक्षित असलेले असावेत हा बदल या कायद्यात होणे महत्त्वाचे वाटते.अन्यथा मराठी आडनाव असलेले किंवा मराठी भाषा येणारे कोणीही या शाळेत मराठी शिकवतात. मंडळानुसार याचा आढावा शिक्षण विभागाने घेणे गरजेचे आहे अन्यथा मुलांचे शैक्षणिक नुकसान खूप आहे. या कायद्याची अंमलबजावणी तत्परतेने व्ह्यायला हवी. - सुशील शेजुळे, समन्वयक मराठी शाळा संस्थाचालक संघ, महाराष्ट्र

मराठी विषयाचे वर्ग या क्रमाने सुरू होतील

प्राथमिक शाळा

इयत्ता- शैक्षणिक वर्ष

पहिली- 2020-21

दुसरी- 2021-22

तिसरी- 2022-23

चौथी- 2023-24

पाचवी- 2024-25

उच्च प्राथमिक व माध्यामिक शाळा

इयत्ता- शैक्षणिक वर्ष

सहावी- 2020-21

सातवी- 2021-22

आठवी- 2022-23

नववी- 2023-24

दहावी- 2024-25

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com