घोडा खरेदी करण्यासाठी केली चोरी

घोडा खरेदी करण्यासाठी केली चोरी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

घोडा खरेदी करण्यासाठी ( To Buy a Horse ) शाळकरी मुलासह एका विधी संघर्षित बालकाने चक्क आठ सायकली चोरी ( Theft of Bicycles )केल्याची घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या( Panchavati Police Station) हद्दीत एक सुमारे 22 हजार रुपये किमतीची सायकल चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार वपोनी डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना पोलीस शिपाई कुणाल पचलोरे व राहुल लभडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनी सत्यवान पवार व त्यांच्या पथकाने दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले.

चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात चोरलेली एक सायकल व इतर सात विविध कंपन्यांच्या सायकली अशा आठ सायकली पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक दीपक नाईक हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com