चोरी
चोरी
नाशिक

दिंडोरी : गोळशी येथील सौरदिपची चोरी

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

गोळशी | Golshi

दिंडोरी तालुक्यातील गोळशी या गावी ग्रामपंचायत मार्फत 5% पेसा अंतर्गत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी लावलेल्या रस्त्याच्या बाजूला सौरदीप चोरटयांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ग्रामपंचायत गोळशीमार्फत पेसा अंतर्गत 5% निधी अंतर्गत रस्त्यालगत सौरदीप गेल्या काही दिवसांत बसवले होते, परंतु काही दिवस होताच अनोळखी व्यक्तीने सौर दीप चोरून नेले.

ग्रामविकास अधिकारी गोळशी येथे अधिकारी सौ. पाटील यांनी दिंडोरी पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदवली आहे. विशेष म्हणजे फिर्याद दाखल होऊन सुद्धा चोरी करणे नं थांबता चोरट्यांनी नित्य नियमाने चोरीचे काम कायम ठेवले. अजूनपर्यंत कुठलीही चोकशी होत नसल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा होत आहे.

शासकीय चोरी होऊनसुद्धा चोर पकडला जात नाही तर सर्वसाधारण माणसांची शेतकर्‍यांची चोरी झाल्यास काय शोध लागणार आणि शासन काय करणार, अशी ग्रामस्तरावर चर्चा होत आहे. या चोरीचा लवकर शोध लावून कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com