निकवेल, दहिंदुले परिसरात चंदन चोरांचा सुळसुळाट

निकवेल, दहिंदुले परिसरात चंदन चोरांचा सुळसुळाट

कंधाणे । वार्ताहर Mandhane-Baglan

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) निकवेल, दहिंदुले शिवारात चंदन चोरांचा (Sandalwood thieves) सुळसुळाट निर्माण झाला आहे. शेतातील हजारो रूपये किंमतीचे चंदनाची झाडे (Sandalwood trees) चोरटे रात्रीतून कापून नेत असल्याने शेतकरी (Farmers) त्रस्त झाले असून पोलिसांनी त्वरीत या चंदन चोरांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

निकवेल येथील अनिल शिवाजी वाघ यांच्या शेतातील चंदनाचे झाड चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कापून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली. चार-पाच दिवसापूर्वी दहिंदुले येथील हिरुबाई विश्वास बहिरम व प्रमिला रमेश ठुमसे यांच्या शेतातून चोरांनी चंदनाचे झाड कापून नेले. विभागाचे वनरक्षक नवनाथ मोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

निकवेल-डांगसौंदाने (Nikvel-Dangsaundane) रस्ता अत्यंत वर्दळीचा असूनही रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन आसपासची चंदनाची झाडे तोडून (cut down the sandalwood trees) त्याची तस्करी (Sandalwood Smuggling) होत आहे. बांधावर राखलेले चंदनाची मौल्यवान झाडे कापून नेली जात असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाली आहे. वन विभागाने (Forest Department) चंदन चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, पोलीस पाटील विशाल वाघ, निकवेल येथील शेतकरी अनिल वाघ व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

चंदन वृक्षावर चंदनतस्कर हात साफ करत असुन अत्यंत वनऔषधी (Herbal medicine) असलेली हे झाड चंदनतस्करांच्या नजरेस पडले असल्याने रात्रीचा फायदा घेत या झाडांची मोठया प्रमाणात कत्तल केली जात आहे. तालुक्याला पोलीस निरीक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नवीनच रूज झाले आहेत. त्यांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

Related Stories

No stories found.