नाशकात 'अशी' झाली पावणेदहा लाखांची चोरी

चार चोरट्यांसह खरेदी करणारे सोनारही जेरबंद
नाशकात 'अशी' झाली पावणेदहा लाखांची चोरी
चोरी

नाशिक | Nashik

नाशिक शहरातील नाव दरवाजा परिसरातील जुन्या वाड्यातून 9 लाख 81 हजार 500 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोकड लंपास करण्यात आल्याची घटना 9 जुनला घडली होती.

भद्रकाली पोलीसांनी या गुन्ह्याचा छडा लावत दोन विधी संघर्षीत बालकांसह 4 चोरटे व चोरीचे दागिणे खरेदी करणारे तीन सोनार अशा 7 जणांना जेरबंद केले आहे. त्यांकडून 5 लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निखील संजय पवार (वय 20, रा. हिरावाडी, पंचवटी), योगेश चंद्रकांत साळी (वय 20, रा.लेखानगर, नवीन नाशिक) व दोन विधीसंघर्षीत बालके, राजेंद्र अशोक अहिरराव (वय 41, रा. म्हसरुळटेक, भद्रकाली), यशवंत ऊर्फ दौलत शंकर सोनवणे (वय 25, रा. डंगरआळी, जुने नाशिक), अमोल किसन राजधर (वय 36, रा. हुंडीवाला लेन, दहिफुल, नाशिक) अशी चोरीचे दागिणे खरेदी करणार्‍या संशयितांची नावे आहेत.

पत्रकार परिषदेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जून रोजी भद्रकालीतील नाव दरवाजा परिसरातील वाड्याचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी किर्तीकुमार शंकर औरंगाबादकर यांच्या वाड्यातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, 60 हजार रुपये व एक सिलिंडर असा एकूण 9 लाख 81 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता.

याप्रकरणी मंदार वडगावकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रकाली व पंचवटी पोलिसांनी तपास सुरु केला. निखील पवार व त्याच्या साथीदाराने घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी निखील पवार, योगेश साळीसह दोन विधीसंघर्षित बालकांना अटक केली.

पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पवारकडून 1 लाख 74 हजार 600 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व 40 हजार रुपये रोख जप्त केले. चोरी केलेले काही दागिने राजेंद्र अहिरराव, यशवंत सोनवणे, अमोल राजधर यांना दिले होते.

पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 96 हजारांचे दागिने जप्त केले. पोलिसांनी एकूण 5 लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com