कळवण । प्रतिनिधी Kalwanकळवण देवळा रोडवरील गणेशनगर भागातील नवीनकोर्टा समोरील किसान ट्रेडर्स मध्ये चोरी झाली .दि 7 ऑक्टॉबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी 1 लाख 60 हजाराचे कांदा बियाणे व रोकड दुकानाचे मागील भागाचा पत्रा कापून लंपास केला आहे.याबाबत दुकान मालक अतुल गोविंद रौंदळ यांचे फिर्यादीवरून कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल रौंदळ हे नेहमी प्रमाणे आज दि 8 ऑक्टॉबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कळवण येथे गणेशनगर भागातील आपले किसान ट्रेडर्स कृषी बियाणे व खतांचे दुकान उघडण्यासाठी आले असता. त्यांना त्यांचा पैशाचा गल्ला उघडा आढळून आला. म्हणून त्यांनी संपूर्ण दुकानाची तपासणी केली असता. त्यांना मागील बाजूचा पत्रा कापलेला आढळला.तसेच दुकानातील माल बघितला असता त्यातील प्रशांत कंपनीचे कांदा बियाणांचे 30 नग प्रति किलो 4500 रुपये किमतीचे ऐकून 1 लाख 35 हजाराचे तसेच मालाव कंपनीचे 5 नग प्रति किलो 4000 रुपये किमतीचे एकूण 20 हजार रुपये व ड्रॉवर मधील 5 हजाराची रोकड असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांची अज्ञात चोरटयांनी चोरी केली आहे. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक येथून श्वान पथकाला पाचारण हे दुकान कळवण देवळा या मेणरोडवर कळवण येथे असल्याने श्वान पथकाने रस्त्यापर्यंतच मार्ग दाखवला आहे. कळवण तालुक्यात कळवण खुर्द, शिरसमणी येथे या पूर्वी अशाच प्रकारच्या चोर्या झालेल्या आहेत. एकदाकी एका चोरीचा छडा लागला की, सर्वच चोर्या उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश निकम तपास करीत आहेत.अतुल रौंदळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि 7 ऑक्टॉबर दुपारी दिड वाजेच्या सुमारास दोन ते तीन इसम कांदा बियाणेबाबत विचारपूस करण्यासाठी दुकानात आले होते. ते संशयित वाटत होते. व ते समोर आल्यास त्यांना ओळखेल.