कांद्याच्या रोपांवर डल्ला

भुरट्या चोरांचा उच्छाद
कांद्याच्या रोपांवर डल्ला

वावी । वार्ताहर

सिन्नर तालुक्यात आता भुरट्या चोरांनी थेट शेतकर्‍यांच्या कांद्याच्या रोपांवर डल्ला मारण्यात सुरुवात केली आहे.

इथून मागे शेतकर्‍यांची उभी असलेली पिके कांदे असो डाळिंब असो किंवा कापूस असो अशा पद्धतीने डल्ला मारण्याचे काम हे भुरटे चोर करत होते.आता शेतात उभे असलेले कांद्याचे रोप चोरुन नेल्याचा प्रकार मिरगाव परिसरात घडला आहे. येथील शेतकरी बाबासाहेब मुक्ता मिसकर यांच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावरील शेतातील जवळपास पाच ते दहा गुंठे कांद्याचे रोप चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.

याआधी काही शेतकर्‍यांचा शेती माल चोरीला जाण्याचे प्रकार घडले असून या चोरांचा सुगावा पोलिसांना अद्यापपर्यंत लागलेला नाही. तर शेळ्या, गायी चोरणारी टोळीदेखील या भागात कार्यरत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. या भुरट्या चोरांचा पोलीसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com