चारचाकी वाहनाच्या काचा फोडून ऐवज लंपास

चारचाकी वाहनाच्या काचा फोडून ऐवज लंपास

इगतपुरी । वाल्मीक गवांदे Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) भावली धरणाजवळ ( Bhavli Dam )धबधब्याचा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नाशिक येथुन कुटुंबासह आलेल्या पर्यटकाच्या गाडीच्या काचा फोडून अज्ञात चोरटयाने सुमारे २५ हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल चोरी करून पसार झाल्याची तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यात ( Igatpuri Police Station )नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. १० रोजी नाशिक येथील फिर्यादी मयुर अशोकराव देवळे, वय ३२ वर्ष, राहणार महालक्ष्मी अपार्टमेंट, काठे गल्ली, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे मयुर व त्याची पत्नी, सासु हे भावली धरणाच्या धबधबा व निसर्ग पर्यटनास आले होते.

त्यांचे मालकीचे वाहन क्रमांक एम. एच. १५ डी. एस.५३८६ नंबरची गाडी भावली धरणासमोरील महामार्ग लगत पार्कीगं करून त्यात ६ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, १ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, रेड मी कंपनीचा मोबाईल, रियल मी मोबाईल, आय एम ई आय रियल मी कंपनीचे असे तीन मोबाईल व किमती वस्तुसह कपडे ठेवुन गाडीच्या काचा व दरवाजे बंद लॉक करून धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

परत ओले कपडे बदलण्यासाठी गाडी जवळ आले असता गाडीच्या काचा फोडुन अज्ञात चोरांनी यातील सोन्याच्या दागीन्यासह मोबाईल चोरी केल्याचे निदर्शनात आल्याने देवळे यांनी या घटनेची माहिती देत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां बाबत फिर्याद दिली.

भावली धरण परिसरातील पार्कीगं केलेल्या वाहनातुन किमती वस्तु, मोबाईल आदि वस्तु भुरटे चोर गाडयांच्या काचा फोडुन पर्यटकांच्या किमती वस्तु चोरी करून पसार होत असल्याचा घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

भावली धरण भागात अनेक पर्यटकांच्या किमती वस्तुसह लहान मोठया चोऱ्या झाल्या मात्र त्याचा अद्याप तपास लागला नाही व मुद्देमाल आणि चोरटे भेटले नाही अशी खंत पर्यटकांनी व्यक्त केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. जाधव व पोलीस पथक करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com