दागिने व रोकड लंपास

पंचवटीत भर दुपारी उघड्या घरात प्रवेश करून चोरी
दागिने व रोकड लंपास

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भर दुपारी उघड्या घरात प्रवेश करत बेडरूममध्ये अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून कपाटाच्या चाव्या काढल्या.

कपाटातील दागिने व रोकड असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे घटना पंचवटीतील शिंदे मळ्यात गुरुवारी (दि. २७) घडली.या प्रकरणी जनार्दन लक्ष्मण शिंदे (रा. शिंदे मळा, कुसुमाग्रज गार्डन रोड, मोरे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे.

गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शिंदे यांच्या घरातील तळमजल्यावरील बेडरूमच्या लोटलेल्या दरवाजातुन आत प्रवेश केला. बेडरूमध्ये अडकवलेल्या पँन्टच्या खिशातुन दोन्ही कपाटाच्या चाव्या काढल्या.

त्यानंतर कपाट उघडुन दोन्ही कपाटातील सोने व चांदीचे दागदागिने व रोख रक्कम चोरून नेली. यात १७ तोळे वजनाची सोन्याचे दागिणे, ३० भार चांदीचे दागिणे असा एकूण ३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि एस. बी. चोपडे तपास करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com