चार चाकी वाहनाची चोरी

चार चाकी वाहनाची चोरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये अज्ञात चोरट्याने बोलेरो पिकअप (Bolero pickup) वाहन चोरून नेल्याची घटना द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपसमोर (Purnima Bus Stop) घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित धनेंद्र सुराणा (Abhijit Dhanendra Surana) (रा. द्वारका) यांनी याविषयी फिर्याद दिली आहे. पौर्णिमा बस स्टॉप समोरील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयासमोर दीपक एंटरप्रायजेस दुकानाच्या पुढे मोकळ्या जागेत त्यांनी (एमएच १४ एझेड २१२९) महिंद्रा बोलेरो पिकअप पार्क केली होती.

 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

चार चाकी वाहनाची चोरी
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात

ही पिकअप अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर सुराणा यांनी गाडीचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com