शेतकऱ्याच्या शेतातून फुलांची चोरी

शेतकऱ्याच्या शेतातून फुलांची चोरी

नाशिक | Nashik

गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या (Corona)प्रादुर्भावामुळे द्राक्ष (Grapes) पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) दिवसेंदिवस द्राक्ष शेती धोक्यात येत असल्याने अनेक शेतकरी (Farmer) आपल्या द्राक्षबागा तोडून आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेती करण्याचे प्रयत्न करत आहेत...

यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा दोन पैसे मिळतील या आशेने फुलांची शेती (Flower Farming) करून शेती फुलवली आहे. गेल्या दोन वर्षापासून दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना करोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांसह किरकोळ व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडून गेले होते.

त्यानंतर यंदा मोठ्या अपेक्षेने झेंडूच्या फुलांची (Marigold Flowers) लागवड करण्यात आली होती. मात्र वरुणराजाच्या अवकृपेमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने झेंडूचे भाव गगनाला भिडतील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु यावर्षीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यातच दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कोराटे (Korate) येथील शेतकरी नंदकिशोर शिंदे (Nandkishore Shinde) यांनी १ एकरमध्ये फुलांची शेती केली असून या फुलशेतीला भरपूर खर्च केला आहे. पंरतु दोन दिवसापूर्वी अज्ञात इसमांनी मध्यरात्रीच्या सुमारास शेतात घुसून फुलांची चोरी (Theft) केल्याने शिंदे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, चोरट्यांनी शिंदे यांची जवळपास ३० ते ४० हजार रुपयांची फुले चोरून नेली. याशिवाय फुलांवरती फवारणी करणाऱ्या नळ्याही कापून नेल्या आहेत. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेशी संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदेंनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com