
नाशिकरोड । Nashik Road
येथील जय भवानी रोडवर (Jai Bhavani Road) असलेल्या एका बंद बंगल्याच्या ( bungalows) दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने (unknown thief) तब्बल १७ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय ईश्वरलाल बोरा (Sanjay Ishwarlal Bora) रा.अश्विनी को-ऑप हाउसिंग सोसायटी ईश्वर बंगला जय भवानी रोड नाशिकरोड (Nashik Road) यांनी या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बोरा हे कुटुंबियासह काही कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या बंद दरवाजाचे कुलूप (Lock) तोडून घरात प्रवेश केला व बेडरूम मध्ये लोखंडी कपाटातून सुमारे १७ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने (Jewelry) चोरून नेले. त्यामध्ये तीन लाख रुपये रोख तसेच नव्वद हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बारा लाख रुपये किमतीचे ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या (gold) पाच अंगठ्या एक लाख ५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या चार चैन ३० हजार रुपये किमतीचे दहा सोन्याचे कॉइन पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे पायल असा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, सदरची घटना समजताच घटनास्थळी गुन्हे शाखेचे (Crime Branch) सहाय्यक पोलीस (Assistant Commissioner of Police) आयुक्त वसंत मोरे (Vasant More) सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ (Siddheshwar Dhumal) वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहायक पोलीस निरीक्षक भामरे आदींनी भेट देऊन चौकशी करून पंचनामा केला. तसेच या प्रकरणी उपनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.