ओझर येथे बांधकाम साहित्याची चोरी

ओझर येथे बांधकाम साहित्याची चोरी

ओझर । Ozar

इमारती बांधकामाच्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले साडे तेरा हजार रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य अज्ञात चोरट्याने शेडचे कुलुप तोडून आत प्रवेश करून चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली.

सोमवारी रात्री साडेदहा ते गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गडाख काँर्नरजवळ सुरू आलेल्या भुषण साहेबराव कदम यांच्या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य इमारती जवळील पत्र्याच्या शेड मध्ये ठेवलेले असतांना अज्ञात चोरट्याने शेडचे कुलुप तोडून शेड मधुन चार हँड कटर, लोखंडी हातोडा, लोखंडी काँलम रिंगा व दोन हॅलोजन फोकस बल्ब असे साडे तेरा हजार रूपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले असल्याची तक्रार कदम यांनी केली आहे.

ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास हवालदार के.बी यादव करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com