एटीएम फोडून रोकड लंपास

एटीएम फोडून रोकड लंपास

सटाणा । प्रतिनिधी Satana

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी 13 लाख 77 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.

सदरचे एटीएम यापूर्वी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र यावेळेस चोरट्यांकडून काही मिनिटांतच एटीएम फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. एटीएम कटरच्या सहाय्याने फोडले. बँकेचे शाखा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये 12 जानेवारी रोजी 13 लाख 77 हजार रुपयांचा रोख भरणा करण्यात आला होता.

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रभारी पोलीस अधिकारी किरण पाटील गस्त घालत असताना 1 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास मालेगावकडे जात असताना एटीएमचे शेटर उघडे होते. परतीच्या प्रवासात 2 वाजून 15 मिनिटांच्या वेळेत शटर बंद असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास येताच संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली.

त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याची सूचना करून गाडीतील सहकार्‍याच्या सहाय्याने शटर उघडले असता एटीएम फुटल्याचे आढळले. तातडीने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना घटनेची माहिती कळवून परिसरातील पोलीस ठाण्याला नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या.

सकाळी बँकेचे अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण पाटील व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रिकरण ताब्यात घेतले. पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बँकेने कायमस्वरुपी हत्यारबंद सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी तसेच पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी शहरातील व्यापार्‍यांसह विविध बँका, पतसंस्था व सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com