किराणा दुकानातून रोख रक्कम व साहित्याची चोरी

किराणा दुकानातून रोख रक्कम व साहित्याची चोरी

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) महामार्गालगतच्या पाडळी फाट्यावरील किराणा दुकानाचे ( Grocery store)शटर तोडुन पहाटे २ वाजेदरम्यान १५ हजार रोख रक्कम व दुकानातील काही साहित्य असे अंदाजे ३० हजाराची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली असुन परिसरात चोऱ्यांच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महामार्गालगत पाडळी फाट्यावर दीपक धांडे यांचे कपड्याचे व किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री दुकान बंद करुन घरी गेले होते रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजारील कपड्याच्या दुकानात दोन जण झोपलेले असल्याने ते शटर दाव्याचा सहाय्याने बंद करून किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला.

यातील १५ हजार रोख रक्कम व दुकानातील काही किराणा साहित्य असे एकुण ३० हजार रकमेची चोरी करुन चोरट्यांनी पोबारा केला. जवळच असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दीपक धांडे यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी येऊन पाहिल्यानंतर वाडीवर्हे पोलिसांत तक्रार दिली असुन कावनई शिवारातील घटनेपाठोपाठ पाडळी फाट्यावरही दुकान फोडल्याच्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असुन वाडीवऱ्हे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवुन सदर घटनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com