दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

नाशिक । प्रतिनिधी Nashik

घरातील लोक झोपले असल्याचा फायदा घेत बेडरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करून (Theft by entering a house through a window)अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र माधवराव येवला (49, रा. फ्लॅट नंबर २, चेतना गौरव अपार्टमेंट, इंदिरानगर, चेतना नगर, नाशिक) यांच्या घरात (दि. 16) रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बेडरूम मधील उघड्या खिडकीतून घरात प्रवेश करून 20 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ( Indira Nagar Police Station )गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार भोजने करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com