
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा रुग्णालयाच्या (Civil Hospital) समोरील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका बसचे (Bus) अज्ञात चोरट्यांनी स्टेपनीचे डिक्कीत ठेवलेले चाक (Tyre) चोरून नेल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
याबाबत सविस्तर माहिती अशी की, (दि.३० रात्री साडेदहा ते 31 सकाळी सहा वाजेच्या दरम्यान) जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ जितेंद्र रमेशचंद्र कटारिया (Jitendra Rameshchandra Kataria) (31,रा. ग्राम जरोली,ता. कसरावत,जि. खरगोन राज्य मध्य प्रदेश ) यांनी त्यांची बस (Bus) लावली होती.
दरम्यान सकाळी ते झोपेतून उठल्यावर त्यांनी बसची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत असलेले बसचे चाक चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास वपोनी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक केशव आडके करीत आहेत.