Video: घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची चोरी; चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नवीन नाशिक | प्रतिनिधी

खुटवड नगर येथे घराच्या समोरून स्कॉर्पिओची चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या मागे ५० मीटर अंतरावर खुटवड नगर पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला ५० मीटर अंतरावर विलास पाटील (६३) यांचा आदेश बंगला आहे. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ घराबाहेर लावली असताना (दि. २७ ) पहाटे ३.४५ ते ४.१५ च्या दरम्यान चारचाकी कार मध्ये आलेल्या तिघांनी स्कॉर्पिओ चोरून नेली.

याबाबत पाटील यांनी तत्काळ पोलीस चौकीला जाऊन तक्रार केली. मात्र चौकीवरील पोलीस झोपलेले होते तर चौकीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांनाच उद्धट वागणूक देत अंबड पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अंबड पोलीस स्टेशनलाही २ तास तक्रार घेण्यात आली नाही तर आम्ही तुमच्या गाड्या सांभाळायच्या का असा उलट प्रश्न विचारण्यात आला.

पोलिसांना नागरीकांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसल्याने जेष्ठ नागरिक असलेल्या पाटील यांना याबाबत मनस्ताप सहन करावा लागला. खुटवड नगर पोलीस व अंबड पोलीस यांच्या बेजबाबदारपणा व वागणुकीबाबत विलास पाटील हे पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहेत. यावेळी घटनास्थळी माजी नगरसेवक तानाजी जायभावे व अलका आहिरे यांनी भेट देत पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com