गोदामात चोरी करणारे दोघे जेरबंद

गोदामात चोरी करणारे दोघे जेरबंद

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गोदामामधून warehouse of Nashik Co-operative Sugar Factory इलेक्ट्रॉनिक पंप चोरणार्‍या दोघे चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी Nashikroad Police अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गोदामामधून के.एस.बी. कंपनीचा सबमर्सिबल पंप व मोटर असा सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. यासंदर्भात योगेश नागरे यांनी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार राजेश साबळे यांना गुप्त माहिती मिळाली असता चोरी करणारे दोघे चोरटे जेलरोड परिसरात राहणारे असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे सपोनि पाटील यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी या गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षावर आरके असे इंग्रजीत काचेवर लिहिलेली रिक्षा असल्याचे समजले.

पोलिसांनी ही रिक्षा व संशयित आरोपी अनिल उर्फ सोनू माणिक शिंदे, रा. वडारवाडी, आढाव पेट्रोल पंपामागे, जेलरोड व रोशन उर्फ बंटी आनंदा गायकवाड, रा. साईनाथ नगर, नांदूर नाका यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमालासह रिक्षा जप्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.