SamantdadaTemple Vadanagali
SamantdadaTemple Vadanagali|Theft captured on CCTV
नाशिक

Video : वडांगळीच्या सतीमाता-सामंतदादा मंदिरात धाडसी चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । Sinnar विलास पाटील

तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामंतदादा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून २ चोरटयांनी चांदीच्या तीन पादुकांसह लाखभर रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मध्यरात्री १२ ते ३ च्या दरम्यान घडली.

देशभरातील बंजारा समाजाचे दैवत असणाऱ्या सतीमाता व सामंतदादा मंदिराचे दरवाजे तोडून आत शिरलेल्या चोरट्याने सतीमाता मंदिरातील चांदीच्या पादुका कटावणीच्या सहाय्याने उचकवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यात यश न आल्याने चोरट्याने सामंतदादा मंदिराकडे मोर्चा वळवला. मंदिरातील चांदीच्या दोन पादुका कटावणीने उचकवटुन ताब्यात घेतल्यानंतर सामंतदादाच्या कानातील चांदीचे दागिनेही चोरट्याने काढून घेतले. त्यानंतर मंदिराच्या शेजारी असणाऱ्या २ छोट्या देवीच्या मंदिरातीलही २ जोड पादुका चोरट्याने ताब्यात घेतल्या.

रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत २ चोरट्यांची ही करामत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दोघांनीही चेहऱ्याला कापड गुंढाळलेले दिसत आहे. त्यातील १ चोरटा मंदिरात तर दुसरा चोरटा आवारात झोपलेल्या सुरक्षारक्षकावर पहारा देण्याचे काम करत असल्याचे दिसून आले.

जवळपास लाखभर रुपयांचे पादुकांसह चांदीचे दागिने घेऊन दोघे चोरटे पसार झाले. माळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे पुढील तपास करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com