फर्निचर दुकानात चोरी

एक पिकअप भरून माल लंपास
फर्निचर दुकानात चोरी

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

बारागाव पिंप्री रोडलगत ( Baragaon Pimpri Road ) सिन्नर न्यायालय परिसरात असलेल्या फर्निचरच्या दुकानाचा ( Furniture Shop )पत्रा कापून फ्रीज, कुलर, फॅन असा एक पिकअप भरून माल लंपास ( Theft )केल्याची घटना शनिवारी (दि.2) पहाटे 4.15 च्या सुमारास घडली.

सिन्नर न्यायालयच्या पुढे बारागाव पिंप्री रोडलगत अरुण उगले यांचे अमित स्टील फर्निचर ( Amit Steel Furniture )नावाचे दुकान असून रात्री 2 च्या सुमारास एक पिकअप दुकानाजवळ येऊन थांबली. त्यातील दोघा तिघांना उतरून दिल्यानंतर पिकअप निघून गेली. हे दुकान 22 बाय 170 फुटाचे असून मुख्य दरवाजा सोडून चोरट्यांनी मागच्या बाजूस 100 फुटावर असणाऱ्या बोळीतील दरवाजाजवळचा पत्रा कापून आत प्रवेश केला. शटरच्या आतून असलेले कुलूप तोडूनव दुकानातील महागड्या वस्तूंची चोरी करत गल्ल्यातील 1700 रुपये रोख रक्कम काढून घेत चेकबुक, स्वॅप मशीन फेकून दिले.

सगळया साहित्याची बांधाबांध केल्यानंतर 4.30 च्या दरम्यान पीकअप पुन्हा आली व रिव्हर्सने थेट मागच्या दरवाजाकडे गेली. अवघ्या 5 मिनिटात पीकअप भरून पिकसह चोरटे पिंप्री रस्त्याने निघून गेले. उगले यांनी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकाणातील 39 हजार 700 रुपयांचे गोदरेज कंपनीचे तीन फ्रिज, 23 हजार 300 रुपयांचे हायअर कंपनीचे 2 फ्रिज , 7 हजार 800 रुपयांचे तीन फॅन, 35 हजार 700 रुपयांचे 2 कुलर असा एकुण 1 लाख 7 हजार 800 माल पिकमध्ये भरून लंपास ते झाले.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह त्यांच्या सेवकांनी दुकानाला भेट दिली. चोरट्यानी जारमधील पाणी पिल्याचेही यावेळी दिसून आले. ठसे तज्ञानी ग्लाससह इतर फर्निचरवरील ठसे मिळवले. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दोन्ही वेळेला पीकअप आल्याचे स्पष्ट दिसत असून स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

चोरांच्या एकूण पद्धतीवरून चोरटे फर्निचर विक्रीच्या व्यवसायात असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. सर्व बांधाबांध झाल्यानंतर पीकअप येते आणि 5 मिनिटात भरून निघून जाते. चोरट्यांनी एकमेकांशी संवाद साधून हे घडू शकते. त्यामुळे घटनेच्या वेळी परिसरात कोणत्या मोबाईलवरून बोलले गेले यावरून चोरट्यांपर्यंत सहज पोहचणे शक्य होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com