नाशकात पुन्हा मोबाईलचे दुकान फोडले; 'इतके' फोन लंपास

Crime news
Crime news

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अज्ञात चोरट्यांनी मोबाईलच्या दुकानाचे (Mobile Shop) शटर उचकावून दुकानातील विविध कंपन्यांचे ३६ नवीन मोबाईल (Mobile), चार जुने मोबाईल व १५ हजार रुपये रोख रक्कम (Cash) असा ऐवजी चोरून नेल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश प्रवीणचंद्र पोमल (५३,रा.मुक्ता पॅलेस, नंदिनी अगरबत्तीच्या मागे, शिवम नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यांचे पंचवटी कारंजा येथील शांती कुटीर गाळा नंबर ४, मुक्ता मोबाईल शॉप या नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने (दि.९) रात्री शटर उचकून दुकानात प्रवेश करून दुकानातील विविध कंपन्यांचे ३६ नवीन मोबाईल, चार जुने मोबाईल व १५ हजार रुपये रोख रक्कम असा ७० हजार १६८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरुण चव्हाण करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com