नाशकात चोरट्यांचा धुमाकूळ; किराणा दुकान थाटेल इतका माल रातोरात लंपास

नाशकात चोरट्यांचा धुमाकूळ; किराणा दुकान थाटेल इतका माल रातोरात लंपास
Crime news

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटी यार्डातील एका होलसेल किराणा दुकानावर (Grocery store) अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत ४ लाख ७६ हजार ५८० रुपयांचे तेलाचे डब्बे लंपास केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...

याबाबत जितेंद्र मांगीलाल भंडारी (Jitendra Mangilal Bhandari) (३९, रा.फ्लॅट नंबर ५, बालाजी विहार, गुरांच्या दवाखान्यामागे अशोकस्तंभ, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे शरदचंद्र मार्केट यार्ड गेट जवळ, जे एम ट्रेडर्स नावाने होलसेल किराणा दुकान आहे.

(दि.१० रात्री ८ ते दि.११ सकाळी १०) दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करून २ लाख ३९ हजार २५० रुपयांचे सोयाबीन तेलाचे १५ किलो वजनाचे ८७ डब्बे,६३ हजार रुपये किमतीचे सोयाबीन तेलाचे १५ लिटर वजनाचे २५ डब्बे,१७ हजार ७०० रुपये किमतीचे सुर्यफुल तेलाचे १५ लिटर वजनाचे ६ डब्बे, २१ हजार ३५० रुपये किंमतीचे सुर्यफुल तेलाचे १५ लिटर चे ७ डब्बे,२० हजार ४०० रुपये किमतीचे गोडेतेलाच्या ५ लिटरच्या २० कॅन,

२३ हजार ५२० रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाच्या ५ लिटरच्या २८ कॅन, ५२ हजार ८०० रुपयांचे सोयाबीन तेलाचे १ लिटर वजनाचे ३२० पॅकेट,१५ हजार ६०० रुपये किमतीचे १ लिटरचे ८० पॅकेट,१२ हजार ९६० रुपयांची साबुदाण्याचे ३० किलो वजनाचे ८ कट्टे व १० हजार रुपये रोख असा ४ लाख ७६ हजार ५८० रुपयांचा माल चोरून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी डॉ. सिताराम कोल्हे (Dr. Sitaram Kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दिनेश खैरनार (Dinesh Khairnar) करत आहेत.

Related Stories

No stories found.