एकाच रात्री तीन दुकाने फोडली; रोख रक्कम लंपास

एकाच रात्री तीन दुकाने फोडली; रोख रक्कम लंपास

दहिवड | वार्ताहर

देवळा तालूक्यातील खारीफाटा येथे मध्ये रात्रीच्या सुमारास ३ दुकाने टाॅॅमी च्या साह्याने पत्रे उचकवत चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

हा प्रकार खारीफाटा भागात घडला असून याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी रोशन शिरसाठ यांचे शेतकरी अमृततुल्य व आडत दुकानाच्या ड्रावर मधून २० हजार,तर आमोल सोनवणे गुरूकृपा ट्रॅॅकक्टर गॅॅरेज मधून ५ हजार तर किरण सोनजे यांच्या कृषीे स्वराज्य दुकानातून १२ ते १४ हजार तर काही साहीत्य चोरीस गेले असून त्यांनी सदर घटनेची तक्रार देवळा पोलीसात केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यानंतर आज रविवारी सकाळी ह्या चोरीच्या प्रकरणाची घटना उघडकीस आली दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दुकानांचे पत्रे उचकवून आत घुसून ३५ ते ४० हजार रुपयांची रोक रक्कम लंपास केली आहे.

या परिसरात आठ दिवसांपुवी सुद्धा चोरी झाली होती. दुकानातील रोकड घेऊन चोरटे पसार होत असल्याने परीसरात व व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .दरम्यान पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व लवकर चोरट्याचा छडा लावून आटक करावी अशी जोरदार मागणी परीसरातून होत आहे.

तक्रारीवरून देवळा पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक कचरे व मोरे यांनी घटनास्थळी पोहचून परीस्थितीची पहाणी करुन पंचनामा केला आहे. तर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनातून पुढील तपास सुरु आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com