गोडाऊन चे कुलूप तोडून चोरी

 गोडाऊन चे कुलूप तोडून चोरी

नवीन नाशिक| प्रतिनिधी New Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या गोडाऊन चे कुलूप तोडून अज्ञात इसमाने सुमारे 3 लाख 71 हजार रुपयांचा चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशू रमेश काळे ( 39, रा. शिवम अपार्टमेंट, गोविंद नगर ) यांच्या आई पल्लवी रमेश काळे यांच्या नावावर असलेली अंबड औद्योगिक वसाहतीतील थर्मोपॅक इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोडाऊनमध्ये अज्ञात व्यक्तीने शटर चे कुलूप तोडून आत मधील लोखंडाचे रॉड व कंपनीचे इतर साहित्य असा एकूण 3 लाख 71 हजार रुपयाचा माल चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय बेडवाल करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com