वणीत टायरच्या शोरूमवर चोरट्यांचा डल्ला

वणीत टायरच्या शोरूमवर चोरट्यांचा डल्ला

ओझे | वार्ताहर | Oze

वणी (Vani) येथे पारख कॉम्प्लेक्समधील अष्टविनायक टायर्स या एमआरएफ टायरच्या शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे....

वणी-कळवण चौफुलीजवळील पारख कॉम्प्लेक्समध्ये सचिन रामदास वाबळे यांच्या अष्टविनायक टायर्सच्या एमआरएफ शोरुमचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शोरुममधील ट्रॅक्टर, कार, आयशर, त्याचप्रमाणे मोठया गाडयांचे नवीन टायर्स, ट्युब व दुकानात असलेले टुलकिटसह अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

दुकानदारास दुकानचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर सपोनि स्वप्नील राजपूत व पोउनि प्रवीण उदे, रतन पगार, रघुनाथ भरसट यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com