उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी

उमराणे | वार्ताहर | Umrane

आज (दि. 19) रोजी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उमराणे (Umrane) येथे तीन ठिकाणी चोरी (Theft) झाली असून दोन मोटरसायकलीही चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे...

उमराणे ग्रामपंचायतीच्या वतीने एक महिन्यापूर्वीच सीसीटीव्ही (CCTV) लावल्याने चोरीच्या घटना व चोर सीसीटीव्ही कैद झाले आहेत. गजानन महाराज मंदिरासमोर नंदकुमार पगार यांचे जनार्दन स्वामी किराणा दुकान आहे. आज पहाटे सव्वातीन वाजता या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील रोख रुपये 5000 व तेलाचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले.

त्यानंतर रामेश्वर पॅलेस येथे फ्लॅटमध्ये राहणारे धीरज धनराज पवार हे गावी गेलेले असल्याचे पाहून घराच्या दरवाजाचे कडी कोंडके वाकवून अंदाजे 20 हजार रुपयांची चोरी केली.

त्यानंतर स्वामी समर्थ किराणा दुकानातून दुकानाचे शटर वाकवून अंदाजे पाचशे रुपयाची चिल्लर चोरली आहे. बाळासाहेब सोनवणे यांची पल्सर मोटरसायकल एम. एच. 41 बी. सी. 3245 ही चोरून नेली होती. ही गाडी मुंबई महामार्गावरील बायपास रस्त्यावर सुभाष हॉटेल समोर सापडली.

उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी
नाशिक तालुक्यात सरपंचपदासाठी 'यांनी' उधळला विजयाचा गुलाल, पाहा संपूर्ण निकाल

रमेश जगताप यांची शाईन मोटरसायकल एम. एच. 15 -1007 चोरट्यांनी पळवली आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी चोरी झालेल्या ठिकाणांची पाहणी केली.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही तपासणी केली असता ४ जण चोरी करताना दिसून आले.

उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी
मोहदरी घाटात 'द बर्निंग कार'चा थरार, पाहा व्हिडीओ...

पुढील तपास पोलीस नायक विजय सोनवणे, पोलीस पाटील अनिल वाघ करीत आहेत. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य व सभापती प्रशांत देवरे यांनी उमराणे व्यापारी पेठ असलेले गाव आहे. गावात स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे, पोलिसांची संख्या वाढवावी, रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी केली आहे.

उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी
नाशिक : ग्रामपंचायत निकालात महिला नेतृत्वाला पसंती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com