त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वरच्या स्टेट बँक इंडियाच्या शाखेत चोरी झाली असून संगणक, कॅमेरा, हार्ड डिस्क, इंटरनेट साहित्य असे सुमारे दोन लाखाचे साहित्य चोरीला गेले आहे. सुदैवाने बँकेतील कॅश सुरक्षित असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणी स्टेट बँकेचे शाखाधिकारी विवेक द्विवेदी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीसाकडे तक्रार दाखल केली आहे. काल रात्री साडे आठ ते आज सकाळी साडे नऊ दरम्यान बॅंकेच्या भिंतीच्या बाजूने बाहेर पडण्यासाठी असलेला शटर दरवाजा तोडून साहित्य गायब करण्यात आले आहे. सुदैवाने स्ट्रॉग रूम सुरक्षित असल्याने कॅश सुरक्षित राहिली.

परंतु बँकेतून तीस हजार रुपये किमतीचे दोन सीपीयू हार्डडिस्क, एक लाख ४० हजार रुपये किंमतीचे संगणक व मॉनिटर, असर कंपनीचे आठ हजार रुपये किमतीचा विडीआर व दोन हजाराचा कॅमेरासह इंटरनेट केबल चोरीला गेली आहे. या प्रकरणी डीवायएसपी भीमाशंकर ढोले, एपीआय पांढरे पो. नाईक भाबड हे तपास करीत आहे.