बीएसएनएल कार्यालयात चोरी
नाशिक

बीएसएनएल कार्यालयात चोरी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील अश्विन नगर येथील बीएसएनएल स्थापत्य विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी कागदपत्रांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (दि. २१) उघडकीस आली. याप्रकरणी अभय दादाजी देवरे (रा. पंचम अपार्टमेंट, कडवे नगर, पाथर्डी रोड) यांनी तक्रार दिली आहे.

अज्ञात चोरट्याने कार्यालयाच्या तीन दरवाजांचे कडी, कुलूप तोंडून आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कागदपत्रांची नासधूस केली. तसेच सेवकांंचे ओळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड चोरून नेले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com