
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
संजीवनगर (Sanjivnagar) परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका मोबाईलच्या दुकानाचे (Mobile Shop) शटर फोडून दुकानात ठेवलेले 31 मोबाईल लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (Prithviraj Nishad) (३६, रा. घर नंबर २८१, गणपती गल्ली, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) यांच्या संजीवनगर येथील दुकानाचे शटर (दि.३० रात्री दहा ते दि ३१ सकाळी सात वाजेच्या दरम्यान) फोडले.
दुकानात ठेवलेले सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे ३१ विविध कंपन्यांचे मोबाईल लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक शांताराम शेळके (Shantaram Shelke) करीत आहेत.