टोळक्याकडून युवकावर धारदार शस्त्राने वार

नागरिकांत भीतीचे वातावरण; घटना सी सी टी व्ही मध्ये कैद
टोळक्याकडून युवकावर धारदार शस्त्राने वार

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

पाच ते सहा जणांच्या टोळक्याने रविवारी दुपारी एका युवकावर धारदार शस्त्राने वार attacked with sharp wepon करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडल्यामुळे नवीन नाशकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन नाशकातील New Nashik रायगड चौक Raigad Chowk परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात मोहन बाळकृष्ण देवकर (२० रा. रायगड चौक ) Mohan Balkrushna Devkar हा तरुण उद्यान परिसरातून जात असतांना समोरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून पूर्व वैमनस्यातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

दरम्यान या टोळक्यातील एका तरुणाने त्याच्या जवळील कोयत्याने मोहनवर वार केले असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. जखमी मोहन याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा शोध घेतला जात आहे. टोळक्यातील बहुतांश मुले अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.