सेल्फीचा मोह पडला महागात; विसर्जनादरम्यान युवक बुडाला

तपासकार्य सुरु
संगमा घाट
संगमा घाट

देवळाली कॅम्प । Deolali Camp

गणेश विसर्जन करताना गजानन पार्क येथील युवक बुडाल्याची माहिती मिळते आहे. बेलदगाव-चेहडी येथील...

बेलदगाव-चेहडी येथील संगमा जवळ हि घटना घडली आहे. अजिंक्य राजाभाऊ गायधनी असे बुडालेल्या युवकाचे नाव असून कुटुंबातील व्यक्ती समवेत विसर्जन साठी नदी किनाऱ्यावर आला होता. विसर्जनादरम्यान फोटो काढतांना पाय घसरला व पाण्यात पडल. पोहता येत नसल्याने या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com