उप रुग्णालय विभागातर्फे जागतिक एड्स दिन रॅली उत्साहात साजरी

उप रुग्णालय विभागातर्फे जागतिक एड्स दिन रॅली उत्साहात साजरी

येवला | प्रतिनिधी | Yeola

1 डिसेंबर 2022 रोजी रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त (World Aids Day) येवले शहराच्या (yeola city) मध्यवर्ती रस्त्यावरून रॅली (rally) काढण्यात आली.

या रॅलीत एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय एसएनडी परिचारिका महाविद्यालय, एस एन डी एसएनडी आयुर्वेद महाविद्यालय, विश्व लता महाविद्यालय, मुक्तानंद महाविद्यालय, जनता महाविद्यालय, येथील विद्यार्थ्यांनी (students) व शिक्षकांनी (teachers) सहभाग घेतला तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्गाने तसेच विद्यालयाच्या शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला.

उपजिल्हा रुग्णालय येवला (Sub District Hospital) येथेळी 9 वाजेला तहसीलदार श्रीमोद हिले (Tehsildar Srimod Hille) यांच्या हस्ते यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंचायत समिती (panchayat samiti) येवला येथील गटविकास अधिकारी अन्सार शेख (Group Development Officer Ansar Shaikh) व नगरपालिका येवला येथील मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर व उपजिल्हा रुग्णालय येवला येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ शैलजा कुप्पास्वामी समुपदेशक श्री देवेंद्र गोफणे व प्रयोगशाळा तंत्रज्ञान नासिम मनियार हे उपस्थित होते.

सदर प्रसंगी तहसीलदार श्री प्रमोद हिले सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी एचआयव्ही एड्स (HIV AIDS) बाबत समाजात असणारे असणारे ग्रह या संदर्भात युवकांना मार्गदर्शन केले व एचआयव्ही बाधित रुग्णांना कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता त्यांना समाजात योग्य ती वागणूक मिळावी या करता युवकांना योग्य ती माहिती दिली सदर रॅलीला माननीय तहसीलदार श्रीमोद हिले यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

तसेच याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक तसेच उपजिल्हा रुग्णालय येवला येथील एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र येथील समुपदेशक श्री गोपने देवेंद्र यांनी युवकांना ह्यावर्षीचे ब्रीदवाक्य आपली एकता आपली समानता एचआयव्ही सोबत जगण्याकरिता याची माहिती करून दिली तसेच सध्या येवला तालुक्यामध्ये असणारे एचआयव्ही संदर्भात मिळणारे सेवा येणारे सेवा एचआयव्ही तपासणी एचआयव्ही संदर्भातील उपचार यासंदर्भात माहिती दिली.

सदर कार्यक्रमांमध्ये मुक्तानंद महाविद्यालयातील प्राध्यापक शरद मोहन पाडवी व प्राध्यापक गुलाबराव जगनराव सोनवणे तसेचएन डीरिकी महाविद्यालयातील तिल प्राध्यापक श्री विशाल ठाकरे जनता महाविद्यालयातील प्राचार्य भाऊसाहेब गमे यांचे महत्त्वाचे योगदान या कार्यक्रमांमध्ये होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्राचे समुपदेशक देवेंद्र गोफणे व प्रयोगशाळा तंत्रज्ञान नासिम मनियार यांनी केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करणे कामी रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा होता

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com