वारकरी संप्रदायाचे कार्य महान

पांडुरंग महाराज घुले यांचे प्रतिपादन
वारकरी संप्रदायाचे कार्य महान

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

‘वारकरी संप्रदायाचे (Varkari Sampraday) कार्य महान असून प्रत्येकाच्या मनात भक्तीभाव जागृत करून खर्‍या अर्थाने माणूस घडविण्याचे काम संतानी केले. सद्गुरु जोग महाराज (Sadguru Jog Maharaj) व त्यांच्या शिष्यांनी संत वाड़मय सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहोचविले. त्यात (वै.) मारोतीबोवा गुरव यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देहु (Shrikshetra Dehu) येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले (Pandurang Maharaj Ghule) यांनी केले.

शिवनई येथे सद्गुरु जोग महाराज वारकरी सेवा मंडळाच्या (Sadguru Jog Maharaj Warkari Seva Mandal) वतीने आयोजित श्रीसंत सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रंसगी (Sreesanth Seva Award Ceremony) बोलत होते. याप्रसंगी माधव महाराज घोटेकर, अशोक महाराज वैद्य, पुरुषोत्तम महाराज घुमरे, ज्ञानेश्वर महाराज गटकळ, हनुमान शिंदे, सुरेश डोखळे, चंद्रकांत आहेर, दिगंबर बोरस्ते, दत्तात्रय तडाखे, बबनराव सानप, संपत पाटील घडवजे, पांडुरंग पाटील गडकरी, काकासाहेब गायकवाड, गोरख शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

(वै.)वामनकाका, (वै.) जगन्नाथ बुवा घोटेकर,( वै.) पंडित बाबा घोटेकर, (वै.) उषाताई गाडेकर, तसेच श्रीनिवास पाटील ( वरखेडा) बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय डुकरे, पंढरीनाथ सानप, फकीरराव गटकळ, अ‍ॅड.सोमनाथ घोटेकर, समीर खैरे, संदीप संधान, कादिरभाई शेख, (मोहाडी) प्रल्हाद आव्हाड, सतीश मोरे आदींना स्मृतिचिन्ह, वारकरी उपरणे, ज्ञानेश्वरी व (वै.) मारोतीबोवा गुरव यांची प्रतिमा देवून पांडुरंग महाराज घुले यांचे हस्ते श्रीसंत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी मधुकर उफाडे, निवृत्ती कोटकर, दिलीप उफाडे, दत्तात्रेय उफाडे, सजन उफाडे, कैलास उफाडे, विलास उफाडे, बापू उफाडे यांच्यासह स्वाध्याय परिवार समस्त भजनी मंडळ उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत विनायक फंड यांनी केले. अभिजित साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रल्हाद आव्हाड यांनी मानले.

Related Stories

No stories found.