सातपूर बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू

सातपूर बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू

सातपूर । प्रतिनिधी Satpur

बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातपूर बसस्थानकाचे ( Satpur Bus Depot )काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. या कामाची सुरुवात मनसे माजी आ. नितीन भोसले यांच्या आमदार निधितून झालेली होती.

त्यानंतर हे काम आ. सीमा हिरे यांच्या कार्यकाळात प्रयत्नांनी युद्ध पातळीवर पूर्ण होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. याबाबत मनसेना तसेच महादेव नगर जनसेवक सामाजिक संस्थेतर्फे आ. सीमा हिरे यांना व बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते.

आ. हिरे यांनी तातडीने निधी उपलब्ध करुन देत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता पूर्ण होत आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विजय अहिरे, अतुल पाटील, भारत भालेराव, संजय तायडे, नरेंद्र पुणतांबेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com